पालकांच्या उदंड प्रतिसादात नवीन दाखल पात्र विद्यार्थ्यांची ट्रक्टर मधून मिरवणूक
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंचे फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन ट्रक्टर मधून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले
सुरुवातीला अध्यक्ष रामदास माळी, उपाध्यक्ष भैय्या कवडे, बिभीषण वसेकर,गोरख वसेकर, राजाभाऊ वाफळकर, रामभाऊ कवडे,विनोद वसेकर,अरुण माळी ,अशोक माळी,विठ्ठल वसेकर, रणदीप शिंगटे, मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे विद्याताई वसेकर,निलावती सरक,मंगल वसेकर,मनिषा वसेकर,यशोदा वसेकर,प्रिती वसेकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी नवीन चालू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांतील नवनवीन उपक्रमाबाबत शाळेचे उपशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी माहिती दिली.त्यानंतर चालू वर्षात महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले,तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा बाबत माहिती देऊन पालकांनी ही आपल्या पाल्याकडे अभ्यासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगितले.
आत्तापर्यंत दिलेल्या अनमोल सहकार्याने शाळेची प्रगती सुंदर झाली असून यापुढील काळात ही असंच सहकार्य करावे असे आवाहन मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी केले.यानंतर सर्व मुलांना गोड खाऊ म्हणून जिलेबीचे वाटप करण्यात आले.यावेळी वाफळकरवस्ती वरील पालक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.