करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने वटपौर्णिमा दिवशी २५ झाडांच वृक्षारोपण
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून याच माध्यमातून आज वटसावित्री पौर्णिमा निमित्ताने करकंब मधील सुहासिनींच्या,जागर टीमच्या महिला शुभहस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करुन वटसावित्री पौर्णिमा साजरी केली.यावेळी वृषाली बोधे,आशा टकले,पूजा पिसे रुपाली देशमुख,,पूजा रणदिवे,उषा पिसे,निर्मला पिसे,सुनिता पिसे,धनश्री पिसे,आरती पिसे,रोहीणी वंजारी,राधा इदाते, ऋतुजा इदाते,शबरी इदाते, शैलजा मुखरे, आदी करकंब गावातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
याच टीमच्या माध्यमातून करकंब गावच्या एन्ट्री पॉईंट वर जवळपास ७०० भारतीय जातीच्या वृक्षांचे यशस्वी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे लेकरागत संवर्धन करण्यासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने सातत्याने प्रयत्न करत आहोत.यासाठी करकंब गावच्या लेकींबरोबर आता सुनेचं झाड,लेकाच झाड,आई वडीलांच झाड, आज्जी आजोबांच झाड आणि आता महाराष्ट्रातील साधूसंताच्या झाडाबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने झाड लावण्याची मोहीम हाती घेतली असून यालाही करकंबकरांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
हे अभियान यशस्वी होण्यासाठी लेकीच्या झाडाचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे, हरिश्चंद्र वास्ते, गणेश पिसे, पांडुरंग काटवटे प्रमोद रेडे अक्षय नगरकर, देविदास काटवटे, विश्वजीत शिंदे,चेतन पुरवत,बापू खारे, सुधीर रणे, धोंडीराम भाजीभाकरे, संदीप काटवटे,आदी अधिक परिश्रम घेत आहेत.
पालखी येण्यापूर्वी करकंब गावात संतांच्या नावानेही वृक्षारोपण करण्यात येणार असून सर्व करकंबकर ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने करण्यात येत आहे.