सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला .
यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी देखील सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून शुभकामना दिल्या.
यावेळी अस्मिता गायकवाड म्हणाल्या की , शिवसेनेची दैदिप्यमान वाटचाल व सामर्थ्यशाली वारसा आपल्या नेतृत्वाखाली पुढे जावा..शिवसेना हा राज्यातील सर्वोत्तम बलवान पक्ष ठरावा ती ताकद आपणास मिळो.. तसेच राज्यातील सर्वसामान्य जनतेचा मन - मनका - मस्तक आणि मनगट आपल्या सामर्थ्यशाली विचाराने बळकट होवो. अशी शुभकामना गायकवाड यांनी यानिमित्ताने देण्यात आल्या.
यावेळी मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या समवेत शिवसेना शहर महिला आघाडीच्या स्वाती रुपनर व ज्योती माळवदकर यांची विशेष उपस्थिती होती.