सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच जनतेचा हा कौल लाख हत्तीचे बळ देणारा आहे, या विजयाने महाविकास आघाडीचे मनोबल वाढवले
महाराष्ट्रातील जनतेने भाजपा च्या कपट नितीला गाडुन टाकले आहे. सुज्ञ जनतेने.मोदी शहा ची एकाधिकार शाही झुगारून टाकली आहे. असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सह माहाविकास आघाडी च्या नेत्यांना भरभरून प्रेम दिले आहे.हा सिलसिला विधानसभेच्या निवडणुकीत कायम राहील
सोलापूर जिल्ह्यातील प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील व ओम दादा निंबाळकर या तिन्ही जागेवरील विजय आम्हाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ दिले आहे --
अस्मिता सुरेश गायकवाड, उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने धाराशिव मतदार संघाचे नवनिर्वाचित खा. ओमदादा निंबाळकर व सोलापूर लोकसभेच्या खा. प्रणिती शिंदे व त्यांच्या विजयाचे शिल्पकार सुशीलकुमारजी शिंदे यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.