नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
असं म्हणतात "उन्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली" नाशिक शहराची ओळख ही ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी व थंड हवेचे ठिकाण अशी आहे. शेकडो बांधव या तीर्थ स्थानी भेट देण्यासाठी येत असतात .याच ठिकाणी नमस्ते नासिक फाउंडेशन नाशिक यांच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्याच प्रेरणेतून 'जेथे कमी तेथे आम्ही'.
या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फौंडेशन यांच्यातर्फे नुकतेच १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक भदाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास वृक्षप्रेमी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड ,धर्मवीर सुनील भाऊ बागुल, स्वप्निल शिनकर,अनिल नाहर, राजू भाई डुंगरवाल, एमपीसीबी चे प्रादेशिक अधिकारी एल एस भड, नाना अलई, आय आर एस चे रिटायर कमिशनर व्ही एच पाटील, बार कौन्सिलचे एडवोकेट वैभव शेटे, नमस्ते नासिक फाउंडेशनचे संदीप देव संजय सोनार, रिजवाना शेख,अशोक सावकार, सचिन राणे, आदी मान्यवर उपस्थित होते.