सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वैशाख मासातील शनी अमावस्या अर्थात शनि जयंती आहे या निमित्त कर्णिक नगर येथील जागृत शनेश्वर देवस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .सकाळी लघु रुद्राभिषेक,नवगृह पुजा, तैलाभिषेक , महाआरती, होम हवन ,गणेश पूजन सायंकाळी गोरज मुहर्तावरती शनि जयंती निमित्त गुलाल कार्यक्रमाचे आयोजन तसेच महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.
बुधवारी सां.7 वा 55 मि. अमावस्येला प्रारंभ झाला व समाप्ती गुरुवारी रा. 8 वा 16मि. झाली .या धार्मिक कार्यक्रमाठी जागृत शनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, पुरोहित राजू कोडम प्रभाकर फलमारे रतन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.