पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि.28 मे 2024 वार मंगळवार रोजी एम.टी.के कंपनी एमटीके टुलिंग अँड इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड एमडी-थिओ किम सर,परचेस मॅनेजर-तौसिफ पाशा,डेप्युटी मॅनेजर टूल शॉप-विनायक माने HR-किशोर हावले यानी,फिटर 06 व इलेक्ट्रीशियन 02, या व्यवसायाततील प्रशिक्षणार्थीची मुलाखती द्वारे एम.टी.के मध्ये निवड करण्यात आली.
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीचे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे, यांनी अभिनंदन केले,या वेळी आय टी आय कॉलेज चे प्राचार्य संतोष गुळवे ,व सर्व निदेशक यांनी ही निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.