भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची परिचारक गटाचे नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली .
उपसरपंच पदी कोणाची वर्णी लागते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते .येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कल्याणराव काळे गटाचे रणजीत जाधव यांची निवड झाली होती. त्यावेळी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले होते.
यावेळी परिचारक गटातर्फे नितीन शिंदे यांचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.तर तिसरी युवक आघाडी कडून जहाराबी शेख यांनी अर्ज भरला होता.यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले आणि 10 मते मिळवून नितीन शिंदे विजयी झाले. यावेळेस ही कोणत्या पद्धतीने मतदान होऊन उपसरपंच पदी कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावेळी मतदान आधीकरी म्हणून ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे व सरपंच रणजित जाधव यांनी सहकार्य केले.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधिकारी संतोष जगताप , पांडुरंग ढवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.