सेलू तालुका प्रतिनिधी तेज न्यूज
यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा द्वारा संचालित यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, सेलू चा वर्ग १२ वीचा एचएचसी बोर्ड परिक्षा २०२४ चा निकाल उत्तम लागला आहे.
यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, सेलू मध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तीन विद्याशाखा असुन त्यांचा एकूण निकाल ६५ टक्के आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यामधे वाणिज्य शाखेतील कु. शालिनी दिपक पराते प्रथम क्रमांक ७६ टक्के द्वारे उत्तीर्ण झाली. प्रज्वल महेंद्र लाडे ७५.८५ टक्के द्वारे द्वितीय तर संकेत दिपक टेंभरे यांनी ७३.५० टक्के द्वारे तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कला शाखेतुन प्रज्वल गौतम बलवीर प्रथम क्रमांक ७४ टक्के द्वारे मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर चेतन संजय कोलते यांनी ६९.३३ टक्के द्वारा द्वितीय क्रमांक तर मुस्कान रमजान मोतनजिरे ६४.६७ टक्के यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच विज्ञान शाखेतून यश राधेशाम असेरा ६७.१७ टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर भूषण मारोती अंबादरे यांनी ६०.६७ टक्के व्दारे व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर रोशन अरुण शिंदे यांनी ५७ टक्के व्दारे तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वीपणे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धाचे अध्यक्ष सन्माननीय समीरभाऊ सुरेशराव देशमुख यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. संदीप काळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रा. प्रविण ठाकरे, प्रा. शंतनु खंडागळे, प्रा. सुदर्शन भगत, प्रा. स्मिता बुरडे, प्रा. विद्याश्री हिंगे, प्रा. सोनाली ठाकरे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे यशस्वीतांचे उपप्राचार्य प्रा. अमित चिनेवार प्रभारी पर्यवेक्षक प्रा. सुनिल धनुले आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी यांनी सुध्दा मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.