भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी या महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या सायन्स विभागाच्या परीक्षेमध्ये अंजली भास्कर लोखंडे या विद्यार्थिनीस 83.67% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर प्रीती प्रशांत माळवदे या विद्यार्थिनीस 80 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळाला.
त्याबद्दल अंजली लोखंडे व प्रीती माळवदे यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच जयश्री शिंदे,विजय शिंदे, शशिकांत विभुते, दिनेश गवळी, राहुल ताटे, ज्ञानेश्वर माळी, सुनील माळी,नामदेव लोखंडे,दत्ता लोखंडे,अरुण लोखंडे, ,महेश लोखंडे , दादा लोखंडे, राजाराम लोखंडे ,नारायण लोखंडे,सोमनाथ लोखंडे, निलकंठ लोखंडे, आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.