पुणे प्रतिनिधी
धनकवडीतील ओढ्या लगतचे राहणारे सदरील नागरिक डासांमुळे स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आरोग्य प्रशासनाला याबाबत तक्रार केली असता रस्त्यावर व वाहत्या पाण्यात किटक व पाउडर फवारणी करताना दिसत आहेत मूळ म्हणजे जिथे जिथे ओढ्यात मोठमोठे खड्डे व बारीक खड्डे यात पाणी साचून डासांच्या उत्पत्ती समोर दिसत असताना व सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना धूर फवारणी करण्यात येत नाही व नागरिकांच्या फक्त डोळ्यात पावडर धूळ फेक करण्याचे काम आरोग्य यंत्रणा काम करताना दिसत आहे.
वारंवार तक्रार करून सुद्धा जर काम होत नसेल तर उद्या 【 शनिवार दि. 18 मे 2024 रोजी 】 आरोग्य विभागाने जर ओढ्या लगतच्या सर्व परिसरात धूर फवारणी केली नाही तर पतित पावन संघटने तर्फे तेच ड्रेनेजचे डास युक्त पाण्याने अधिकाऱ्यांचा अभिषेक करण्यात येईल याची पालिका प्रशासनाने नोंद घ्यावी. अन्य था या परिसरातील नागरिक करणार अभिषेक आंदोलन करणार असल्याची माहिती खडकवासला विभाग पतित पावन संघटना अध्यक्ष विजय विठ्ठलराव क्षीरसागर 8087550108 यांनी दिली आहे.