पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
सरकोली ता पंढरपूर येथील दिलीप सोपान कराळे यांच्या मातोश्री स्मृतीसेष पारूबाई सोपान कराळे यांच्या मृत्युचा पाचवा दिवस 17-5-24 रोजी सरकोली ता पंढरपूर येथील पर्यटन स्थळावर दिलीप, झिंगर, सुवर्णा या बहीण भावाने आंब्याची रोपे लावून. त्या रोपांच्या संवर्धनासाठी 5501/₹ देवुन साजरा केला.
सरकोली येथे पर्यटन स्थळ निर्मितीचे काम सुरू झाल्यापासून गावकरी बांधव घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतरचा पाचवा, दहावा, बारावा, वर्षे श्राध्द व वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करतात. लोक स्वताहून आशा उपक्रमासाठी पुढे येवू लागले आहेत. आम्ही पर्यटनस्थळ निर्मिती चे सेवेकरी यांच स्वागत करतो.त्यांनी लावलेल्या वृक्षाचे काळजीपूर्वक लक्ष देवुन संवर्धन करतो. माणसाच्या मृत्यू नंतर त्यांची आठवण,स्मृती झाडाच्या रूपाने जाग्रुत ठेवण्याचे काम होवू लागले आहे.या वर्षीचा उन्हाळा आपण सर्वांनी आनुभवला. शेती बांधावरील, रस्त्यालगतची घरासमोरील झाडे मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. झाडांची आठवण उन्हाळ्यात सावलीसाठी होते. जिथे सावली दिसेल तेथे पशु, पक्षी, माणस,सहारा घेतात. वाहने सावलीत उभे करतात. परंतु झाडे लावण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. झाड आसाव पण ते माझ्या घरासमोर, शेतात नको.सरकारने बोगस वृक्षारोपण बंद करून प्रत्यक्ष झाडे लावण्याची मोहीम तात्काळ हाती घ्यावी. जी माणसे वृक्षारोपण करणार नाहीत त्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून दूर ठेवले तरच देश उन्हाळ्यातील उष्णतेपासून वाचेल. नाहीतर पृथ्वीवरील जीवसृष्टी उष्णतेने लाहीलाही होवून करपुन जाईल. त्यावेळी वेळ निघून गेली असेल.
सरकोली पर्यटन स्थळावर गावकरी बांधव वृक्षारोपणाचा उपक्रम राबवीत आहेत. ती चळवळ गावागावात, शहरात राबवावी व या मोहिमेला सरकारने प्रोत्साहन द्यावे ही विनंती. आजचे वृक्षदाते कराळे बंधू भगीनींच आभार मानले.
सेवेकरिता- बंधू विलास श्रीरंग भोसले मा पोलीस अंमलदार. 9923433535.