सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सी.बी.एस.ई) दिल्लीच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेचा आमच्या सिंहगड पब्लिक स्कूल केगाव शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही १००% लागला आहे. त्यामुळे दरवर्षी मुलांच्या प्रगतीचा आलेख हा उंचावणारा असुन दहावीच्या १००% निकालाची परंपरा आजही कायम आहे.यंदा ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह(८०.००% वरती) घवघवीत यश संपादन केले. अर्णव वटमुर्गे याने ९४.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, आदिती शिंदे हिने ९४.२०% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, अवनी पाचपुंड हिने ९२.२०% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक, हर्षवर्धन गवळी याने ९२.००% गुण प्राप्त करून चौथा क्रमांक व विधी थोरात आणि जय अवताडे या दोघांनी ९१.००% गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. निखत शेख, उपप्राचार्य श्री. प्रकाश नवले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.