रत्नागिरी प्रतिनिधी तेज न्यूज
दि.7/4/ 2024 रोजी दापोली येथील रसिक रंजन हॉल येथे सौ.दिप्ती दत्तात्रय माळवदे यांना श्रमजीवी राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहाय्यक पोलीस उपायुक्त ॲडव्होकेट धनराज वंजारी यांच्या हस्ते देण्यात आला. सौ. दिप्ती माळवदे यांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करत आज पर्यंत अनेक विद्यार्थी इ. पाचवी आठवी स्कॉलरशिप आणि नवोदय व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आणले आहेत. तसेच कोरोना सारख्या महामारीत स्वतःला झोकून देऊन विद्यार्थ्यांना विना मोबदला घडविण्याचे कार्य केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानरूपी विचारांचा वसा घेऊन अनेक विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून देऊन मेरिटमध्ये आणलेले आहे.
अशा शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या दिप्ती माळवदे यांची श्रमजीवी परिवार संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल पुष्पगुच्छ आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षका पुरस्काराने सन्मानित केले.
या कार्यक्रमाला श्रमजीवी संस्थेचे प्रमुख प्रकाश कावणकर महाराष्ट्र पोलीस उपायुक्त ॲडव्होकेट धनराज वंजारी, अमोल कुलकर्णी , हरेश कावणकर , सुरेश पाटील , मुळेसाहेब तसेच सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी जि.प.केंद्रशाळा केळशी नं.1शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रवीण भालेराव आणि माजी शिक्षिका श्रीमती. लोंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाची प्रत,फेटा,शाल, सन्मान चिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक अध्यक्ष धनराज वंजारी यांच्या हस्ते सौ.माळवदे मॅडमना प्रदान करण्यात आला. सौ. माळवदे यांचे केळशी दापोली आणि रत्नागिरी परिसरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
तेज न्यूज चॅनलची वतीने हि आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल राजश्री दत्तात्रय माळवदे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.