शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
स्वामी समर्थ दूध शीतकरण केंद्र शेळवे पाच एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेले आहे . हे केंद्र पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग रोड वरती कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेजारी आहे. या दूध शीतकरण केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी केंद्र सुरू करताना शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
तसेच यावेळी दशरथ पाटील राहुल पाटील विवेक पाटील एडवोकेट नवनाथ पाटील अर्जुन आसबे नितीन आसबे परमेश्वर आसबे व भागवत भाऊ गाजरे सुधाकर गाजरे विष्णू लोकरे अक्षय गाजरे सागर गाजरे मधुकर लोखंडे तसेच राजारामबापू पाटील दूध संघाचे सुपरवायझर निहाल तांबोळी संजय मोकाशी व इतर कर्मचारी उपस्थित होते. तरी शेतकऱ्यांनी या दूध शीतकरण केंद्राचा लाभ घ्यावा हे केंद्र पंढरपूर पुणे रोड शेळवे येथे आहे.