सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर येथील दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप हे दिनांक 28/3/2024 रोजी आपल्या कार्यालयात (1568 दाजी पेठ सोलापूर ) येथे दैनिक अबतक वृत्त पत्र चे कामकाज करत असताना त्याच भागातील राहणारे सीताराम बत्तूल या व्यक्तीने प्रसाद जगताप यांना तू आमच्या भावाला अर्ज का टायपिंग करून देतो माझ्या विरुद्ध तक्रार का लिहून देतो तुला सोडणार नाही तुला बघून घेतो म्हणून शिवीगाळ व धमकी दिलेली आहे. या बाबत दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप यांनी दिनांक 28/3/2024 रोजी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.
दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप यांना धमकी दिल्याची माहिती मिळाताच पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक होऊन प्रसाद जगताप यांना धमकी व शिवीगाळ कारणाऱ्या सीताराम बत्तूल या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
पत्रकारांना दिलेली धमकी खपवून घेतली जाणार नाही
हल्ली पत्रकारांवर हल्ले धमकी असे प्रकार खूप वाढले असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी म्हटलं आहे
पत्रकारांना धमकी ही निंदनीय बाब
यावेळी सोलापूर वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विष्णू (महाराज ) कारमपुरी यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत पत्रकारांना धमकी देणे ही बाब निंदनीय असल्याचे सांगून अश्या घटनेला सरकार ने आळा घालायला हवा अशी मागणी केली.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप कुणाल धोत्रे डी डी पांढरे संतोष जाधव विठल वठारे यलप्पा अगलदिवटे श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी रिजवान शेख सुमित भांडेकर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.