अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
अक्कलकोट तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात शिंदखेडे गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात, उस्पुर्त स्वागत केले. आपण आपल्या भागातील सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार, आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे.
आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा, असे आवाहन या प्रसंगी केलं. ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास असल्याने विजय साकार होईल, याबाबत शंकाच नाही.
याप्रसंगी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धार्थ गायकवाड, व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.