सोलापूर प्रतिनिधी
महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महेश साठे यांच्या लक्ष्मी टाकळी पंढरपूर येथील निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
या बैठकीस उपस्थित शिवसेना पक्षाचे पदाधिकारी महेश साठे संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा, सौ अनिताताई माळगे संपर्कप्रमुख महिला आघाडी सोलापूर लोकसभा, श्री लक्ष्मीकांत ठोंगे पाटील जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख सौ मुबिना मुलानी, सौ आरती बसवंती,दिलीपभाऊ कोल्हें ,युवासेना जिल्हाप्रमुख प्रियंका परांडे ,श्री उमेश गायकवाड, श्री दादासाहेब पवार, संतोष जाधव सर, सौ मुक्ताताई खंदारे, सौ यास्मिन पठाण, सौ स्वामी मॅडम, महेश ताठे ,महादेव भोसले ,सरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, पवार मॅडम, जाधव मॅडम, प्रीतम जाधव, सरपंच विक्रम आसबे, विकी मेटकरी, शुभम लकेरी संजय सरवले भाऊ कदम व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये 2014 पासून ते 2024 पर्यंत सातत्याने पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातून बीजेपी चे उमेदवार यांना आज पर्यंत लीड दिलेला आहे त्या लीडमध्ये अधिकची भर नक्कीच आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी भर घालण्यात कमी पडणार नाहीत व बीजेपीच्या उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतः उमेदवार समजून जीवाचे रान करून काम करून अधिकचा लीड देऊ असे आश्वासन सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महेश नाना साठे यांनी उमेदवार राम सातपुते यांना दिले.
यावेळी श्रीराम सातपुते साहेब यांनी मित्र पक्षांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल त्याचबरोबर निधीच्या किंवा विकास कामाच्या बाबतीत मध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल भाजपच्या पदाधिकाऱ्यां बरोबरच सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे अभिवचन यावेळी राम सातपुते यांनी दिले. विकासाच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सोलापूर लोकसभेच्या विकासाच्या बाबतीमध्ये देखील कुठेही मी कमी पडणार नाही मी एक सर्वसामान्य ऊसतोड कामगारांचा मुलगा आज कष्टातून व स्वकर्तृत्वातून या ठिकाणी पोचलो आहे म्हणून मला सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत काय समस्या आहे या मी जवळून पाहिलेले आहेत.
त्यामुळे नक्कीच मी चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करू शकतो आणि मला त्याची आवड आहे असे देखील यावेळी त्यांनी बोलले या कार्यक्रमास जवळपास 300 कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर राम सातपुते बरोबर देखील बीजेपीचे राष्ट्रवादीचे इतरही पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते