सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री कसबादेवी देवस्थान (फिरकी अंबाबाई) ही मूर्ती २०० ते ३०० वर्षापूर्वी कै. रामापा अंबण्णा मसरे पूर्वजांच्या जागेत घरबांधकाम करत असताना छोटीसी मूर्ती सापडली सदरहू जागेत मंदिर बांधकाम करुन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली होती. सदरहू जागेत नवीन मूर्ती स्थापन करण्याचे मंडळाचे वतीने आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी १००८ जगदगुरु डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीक्षेत्र काशीपीठ यांच्या अमृतहस्ते १ मे २०२४ रोजी सकाळी ८.३१ मिनिटांनी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास श्री.ष.ब्र.वीरतपस्वी वीरभद्र शिवाचार्य (रेवणसिध्द सिध्दाश्रम कडगंची, सोलापूर) तसेच श्री.ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी (नागणसूर)* *व ह.भ.प. गहिनीनाथ महाराज (औसा संस्थान व श्रीक्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सहअध्यक्ष) यांच्या उपस्थितीत शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या अधिपत्याखाली धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे* सोमवार दि. २९/४/२०२४ रोजी सकाळी १०.वा. मंडप सर्व देवता आवाहन, होम हवन प्रारंभ, व संध्याकाळी ४.०० वा. मल्लिकार्जुन मंदिरापासून मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर श्री.एम. राजकुमार यांच्या शुभहस्ते नूतन मुर्तीस पुजा करुन मिरवणूकीस प्रारंभ होईल. सदर कार्यक्रमास मा. सह. आयुक्त सो.म.पा. संदिप कारंजे साहेब, व मा. आ. विजयकुमार देशमुख....मा. आ. प्रणितीताई शिंदे, मा. मल्लिनाथ मसरे. मा. प्रकाशजी वाले, मा. सोमनाथजी भोगडे, मा. जगदीश पाटील, मा. अमर पुदाले, मा. अमोल शिंदे, मा. विनायक विटकर, मा. श्रीशैल बनशेटटो. मा. चिदानंद वनरोटटे, मा. नाना काळे, मा. महेशजी थोबडे, मा.सुधीर थोबडे, मा.राजू हिरेहब्बू, मा.सुशिल बंदपटटे, अॅङ मिलिंद थोबडे या मान्यवरांच्या उपस्थित भव्य मिरवणूक शोभायात्रा मार्ग मल्लिकार्जुन मंदिर पासून सुरुवात होणार आहे.
चाटी गल्ली, सराफ बाजार, माणिक चौक ,सोन्या मारुती ,दत्त चौक ,महालक्ष्मी दूध डेरी ,मसरे यांच्या घरापासून,मल्लिकार्जुन मंदिरापासून गवंडी गल्ली मार्गे भोगडे गल्ली निघणार आहे, या मिरवणुकीत ५५० सुवासिनीचा जलकुंभ निघणार आहे व मूर्तीस जलाधिवास हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. नंतर संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.मंगळवार दि ३०/४/२०२४ सकाळी ८.०० वा. नवचंडी होम व धान्यधिवास हे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. ०१/०५/२०२४ रोजी सकाळी ८ वा. ब्राम्ही मुहूर्तावर मूर्ती संस्कार व काशी जगदगुरु महास्वामी यांच्या अमृतहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कळसारोहण, पूर्णाहुती व धर्मसभा होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरहू कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष कैलास भिमाशंकर भोगडे.मंडळाचे उपाध्यक्ष सुनिल रामप्पा मसरे, अप्पासाहेब विजयकुमार बिराजदार,सेक्रेटरी सचिन मल्लिनाथ म्हेत्रे, कार्याध्यक्ष भारत सुरवसे, खजिनदार रविकोरे, तसेच मंडळाचे सल्लागार शिवलिंग भोगडे, मल्लिनाथ (तम्मा) रामप्या मसरे, दिपक विराजदार, अनिल मसरे, वैभव अरुणकुमार साखरे, राहुल भोगडे, भैय्या बनसोडे, प्रसिध्दी प्रमुख सोमशेखर ईरप्पा भोगडे, सुरेश भगत, बिपिन धुम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळाचे सदस्य वाळू कानाडे, दिपक बिराजदार,घनशाम महाजन, रोहित विराजदार, मल्लिनाथ बोडगे, रवि मस्के, राजेंद्र पांढरे, नरसिंह आणवेकर, सिध्देश्वर भोगडे, वैभव विराजदार, श्रीदेव सुरवसे, सुरेश भोगडे, मल्लिनाथ बडवणे, रवि तंबाके, गहुन मैंदगी, शिवानंद भोगडे, महेश मैंदर्गी, नागेश भोगडे, शैलेश भोगडे, केदार भोगडे, मेघराज भोगडे, चेतन भोगडे, ओमप्रकाश भोगडे, योगेश भोगडे, ओंकार भुरळे, केदार लोणी यांच्या उपस्थित सदरहू धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी
सदरहू कार्यक्रमास सर्व भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सेक्रेटरी सचिन म्हेत्रे यांनी केले आहे.