सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य “महाविजय संकल्प सभा” आपल्या सोलापुरात अत्यंत उत्साहात पार पडली.
सोलापूरने अवघ्या ४-५ महिन्यांत दुसऱ्यांदा मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा अनुभवला. याप्रसंगी सोलापुरातील विणकर बांधवांनी विणलेली आणि मोदीजींचे नाव खास शैलीत रेखाटलेली सोलापुरी चादर तसेच एक सुरेख मूर्ती समस्त सोलापूरकर मायबाप जनतेच्या वतीने त्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मोदीजींनी सोलापूरकरांशी अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक संवाद साधला. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, तसेच देशाचे भवितव्य ठरविणारे महत्वाचे निर्णय यांचा यावेळी मोदीनी मागोवा घेतला. तसेच देशातील गरीब, वंचित, आदिवासी, दलित, ओबीसी या सर्व मागास घटकांच्या विकासासाठी मोदी सरकारच्या काळात विविध विकासयोजना राबविण्यात आल्या. काँग्रेसचा जातीयवादी, विषमतावादी व खोटा चेहरा देखील त्यांनी यावेळी उघड केला. भारतीय जनता पार्टी देशसेवेसाठी काम करत असून विविध कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवत गेल्या १० वर्षांत २५ कोटी गरिबांना गरिबीमधून बाहेर काढले.
सोलापुरात साकारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मोदीजींच्या हस्ते झाले. ती आठवण सांगत त्यांनी “मी तेव्हा काहीतरी देण्यासाठी आलो होतो, आज काहीतरी मागण्यासाठी आलो आहे” अशी भावनिक साद सोलापूरकरांना घातली. तसेच हे मागणं देखील भविष्यात तुम्हाला भरभरून देण्यासाठीच असल्याचा विश्वास देखील दिला.
याप्रसंगी मोदीजी म्हणाले “सोलापूरच्या विकासाची कडी बनण्यासाठी राम सातपुते सज्ज आहेत. त्यांना बहुमताने विजयी करा. त्यांना दिलेलं मत थेट मोदीला मिळणार आहे” असं आवाहन केलं. हा क्षण माझ्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या या शब्दांनी मला सोलापूरकरांच्या विकासासाठी शतपट ताकदीने काम करण्याची ऊर्जा आणि ताकद मिळाली.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सभेला संबोधित करत सोलापूरमधील कामांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जातीयवादी विरोधकांना घरचा रस्ता दाखवण्याचे आवाहन करत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोदीजींच्या शिलेदाराला निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आ.राम सातपुते म्हणाले की ,मी देखील उपस्थितांशी संवाद साधत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश वाटचाल करत असून विडी कामगारांचं शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरातील विडी कामगारांसाठी काँग्रेसने ६० वर्षांत एकही योजना आणली नाही. मात्र मोदीजींनी विडी कामगारांसाठी ३० हजार घरांचा देशातील सर्वांत मोठा गृहप्रकल्प सोलापुरात साकारून दाखवला. त्यामुळे देशाच्या व सोलापूरच्या विकासासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन मोदीजींच्या नेतृत्वाला निवडून देण्याचा संकल्प उपस्थित नागरिकांसोबत केला.
याप्रसंगी शिवसेना नेते, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, आ. सुभाष बापू देशमुख, आ. विजय मालक देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. शहाजी बापू पाटील, आ. समाधान आवताडे, आ. संजय मामा शिंदे, आ. सचिन दादा कल्याणशेट्टी, आ. जयकुमार गोरे, आ. यशवंत माने, ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील, निवडणूक प्रमुख विक्रमजी देशमुख, रश्मीताई बागल, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, प्रणव परिचारक, राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश दादा पाटील, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे, जिल्हा सरचिटणीस मनिष भैय्या देशमुख, मा. जिल्हाध्यक्ष व भाजपा कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, शोभाताई बनशेट्टी, शिवानंद पाटील, ज्योतीताई वाघमारे,अमोल शिंदे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.