मुंबई /सोलापूर प्रतिनिधी
आज मा. उच्च न्यायालय , मुंबई मध्ये सुरू असलेल्या सोलापूरच्या जुनी मिल जागेच्या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार कुमार शंकर करजगी यांचा जामीन रद्द होण्याच्या दाव्यामधील न्यायाधीश श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपीचे वकील एडव्होकेट उदय वारुंजीकर हे अनुपस्थितीत असल्यामुळे 16 एप्रिल रोजी हे जामीन रद्द प्रकरण अंतिम सुनावणीस ठेवण्यात आलेले आहे. आज दाव्या दरम्यान आरोपी कुमार करजगी कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर नसल्याचे निरीक्षण कोर्टाने अत्यंत प्रकर्षाने नोंदवलेले आहे .आरोपीतर्फे देण्यात आलेले म्हणणे कोर्टाने फेटाळून लावले आहे.
या दाव्यामधील अर्जदार व जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे सचिव डॉ. संदीप आडके यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या पुरवणी कागदपत्रांना कोर्टाने मान्य केले आहे .तसेच डॉ. संदीप आडके स्वतः कोर्टामध्ये हजर असल्यामुळे या दाव्यामध्ये त्यांचा अर्जदार म्हणून काय सहभाग आहे तसेच या दाव्याबद्दल न्यायाधीशानी विचारलेल्या सर्व माहितीची अतिशय समाधानकारक उत्तरे डॉ. संदीप आडके यांनी कोर्टात दिल्यामुळे कोर्टाने वरील सर्व घोटाळ्याच्या निदर्शनांची नोंद अतिशय गांभीर्याने घेतली आहे. दुपारच्या सत्रात त्याची सुनावणी पुन्हा ठेवण्यात येणार होती परंतु कुमार करजगी यांच्या वकिलांनी डॉ. संदीप आडके यांनी दाखल केलेले पुरावे व कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी मेहेरबान कोर्टाकडे वेळ मिळावा म्हणून विनवणी केल्यानंतर 16 एप्रिल रोजी या जामीन रद्द करण्याच्या दाव्याची अंतिम सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.
जुनी मिल ट्रस्ट द्वारे एडव्होकेट आर् व्ही संकपाळ व एडव्होकेट पटेल,तसेच सरकारी वकील अमित पालकर व आरोपी तर्फे एडव्होकेट गीध हे काम पाहत आहेत.