जयसिंगपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जयसिंगपूर येथील संत नामदेव शिंपी समाजातील कुमार आदित्य सचिन पाखरे या विद्यार्थ्याने नाईस मॅथ्स एंट्रन्स टेस्ट मध्ये प्रथम क्रमांक व भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत 100 पैकी 96 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्या बद्द्ल तसेच कुमार श्रेयस सचिन पेठकर याने बी कॉम तिसऱ्या वर्षात ऍडव्हान्स बँकिंग या विषयात डिस्टिंगशन मिळवल्या बद्दल या दोन्ही विध्यार्थ्यांचा सत्कार अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नारायणराव पाथरकर, यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभास महासंघाचे राष्ट्रीय सचिव महादेवराव खटावकर, पांडुरंग दाभोळे, शिरोळ तालुका महासंघाचे अध्यक्ष सुरेश पुकाळे साहेब, ह.भ .प श्री रामकृष्ण बगाडे महाराज महिला प्रतिनिधी शशिकला उरुणकर, भिकाजी गाणबावले क्डेगाव चे संतोष मुळे गडहिंग्लजचे तालुका अध्यक्ष श्री भारत कोळेकर, तुकाराम खटावकर शिरोळ तालुका उपाध्यक्ष अजय मिरजकर ,कार्याध्यक्ष अजय पुकाळे , सेक्रेटरी दत्ता पोरे , आशिष उंडाळे दिनकर पंतगे गडहिंग्लज येथील महिला तसेच जयसिंगपूर येथील संत नामदेव शिंपी समाजातील महिला व नामदेव युवा मंडळ चे तरुण कार्यकर्ते आणि संत नामदेव शिंपी समाजातील 100-125 समाज बांधव हजर होते.