मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
अखिल भारतीय अांतरविद्यापीठ नेटबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर नेटबॉल (पुरुष) संघामध्ये येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संकेत कणसे (बी.एस्सी. भाग १), कैफ बागवान (बी.ए. भाग १), रोहित देशमुख (बी.ए. भाग ३), अजय हाटकर (बी.ए. भाग ३) या चार खेळाडूंची निवड आहे. तसेच महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सम्राट शिंदे यांची शिवाजी विद्यापीठ नेटबॉल (पुरुष) संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
श्री सिद्धार्थ अकॅडमी ऑफ हायर एजुकेशन, टुमकुर (कर्नाटक) येथे राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा होत आहेत. मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, प्राचार्य डॉ. शौकतअली सय्यद, प्रा. सिद्धेश्वर सपकाळ, प्रा. शिवशंकर माळी व अन्य मान्यवरांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.