मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
"अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन व योग्य मार्गदर्शन हाच स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथ, अभ्यासातील रणनीतीचा वापर करून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीला सामोरे जावे. अभ्यास करत असताना तंत्रज्ञानांची मदत घ्यावी." असे प्रतिपादन जीवन प्रबोधनी महिला महाविद्यालयाचे प्रा. विनोद निकम यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शौकतअली सय्यद होते.
यावेळी या विभागाच्या प्रमुख डॉ. हेमांगिनी माने यांनी प्रस्तावना केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शौकतअली सय्यद यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना भविष्याचे नियोजन करावे, याविषयी आपली मत मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.विलास बोदगिरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.