खरोखरच यालाच म्हणतात,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे , मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी गुरुवर्य मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा सुरू आहे.
ता 18.2.2024. रोजी अक्षय शेलार राहणार शेटफळगडे हे पेशंट वीट भट्टी वरती काम करताना चक्कर येऊन बेशुद्ध पडले असता तेथील कामगारांनी बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे फोन नंबर 9850020274 या नंबर वरती त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधून घडलेला संदर्भ सांगितला असता त्यांनी ॲम्बुलन्स साठी प्रयत्न केले असता ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नसल्या कारणाने त्यांनी त्यांच्याच मोटरसायकलवर वरील पेशंट जिथे वीट भरती वरती काम करत होते ते गाव म्हणजे शेटफळगडे या गावी जाऊन त्या पेशंटला स्वतःच्या गाडी तून तात्काळ व वेळेत सिल्वर जुबली हॉस्पिटल बारामती येथे दाखल केले व तेथे हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉ. महेश जगताप यांच्या फोनवरती संपर्क केला असता त्यांनी तात्काळ हॉस्पिटल मध्ये येऊन तेथील उपलब्ध असलेल्या डॉ. जरांडे यांना घेऊन पेशंटची तपासणी केली असता वरील पेशंटचे प्लेट काउंट 50000 च्या आत मध्ये आलेले आहे असे समजले.
लगेचच त्या पेशंटला ऍडमिट करून येऊन त्यांच्यावरती उपचार चालू केले सध्या पेशंटचे परिस्थिती अतिशय उत्तम झाल्या कारणाने आज जवळजवळ 6 ते 7 दिवस झाल्याकारणाने पेशंटला डिस्चार्ज दिला वरील पेशंटचे खाजगी हॉस्पिटल मध्ये 30 ते 40 हजार रुपये सर्व तपासणी व औषध मिळवून गेले असते. परंतु बारामती सिल्वर जुबली चे इन्चार्ज डॉ. महेश जगताप व डॉक्टर जरांडे व तेथील स्टॉफ ने या सर्वांनी मिळून अतिशय उत्कृष्टपणे वरील पेशंट वरती उपचार केले.
वेळेत मदत केलेले सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे व सिल्वर जुबली हॉस्पिटल बारामतीचे मेन इन्चार्ज डॉ. महेश जगताप डॉ. जरंडे व तेथील स्टॉफ व सतीश गावडे यांना पेशंटला आणण्यासाठी ज्यांनी जिकारीची मदत केली ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी मोहसिन शेख व उमेश गोलांडे यांनीही वरील पेशंट बारामतीला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्यामुळेचे पेशंटच्या नातेवाईकांनी वरील सर्वांचे खूप खूप आभार मानले.