सकारात्मक विचारांसोबत सकारात्मक कृती करा- डीक पाराशीनी
सकारात्मक विचारांसोबत सकारात्मक कृती करा.
सोलापूर प्रतिनिधी
सकारात्मक विचारांसोबतच सकारात्मक कृती देखील आवश्यक आहे.यशस्वी होण्यापेक्षा समाधानी महत्वाचे आहे.सकारात्मक जीवनाची चावी आपल्या प्रत्येकाकडे आहे फक्त ती शोधायला हवी असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वक्ते डिक पाराशीनी यांनी केले.कोणत्याही पेशामध्ये सदैव सकारात्मक राहणे हे आव्हानात्मक असले तरी अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वक्ते तथा 'लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह ' फौंडेशन चे संस्थापक डीक पाराशीनी (दुबई यूएई) यांनी केले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव येथील माजी विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी डिक पाराशीनी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य. डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे व डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. सुनीता सगट उपस्थित होते.
यावेळी सुजाण नागरिक, कुटूंब व्यवस्था व निगडित समस्या हाताळताना उद्भवणारे प्रश्न, आरोग्य, कामाच्या ताणाचे नियोजन, परिवार व काम यांची योग्य सांगड कशी घालावी आशा तरुणांच्या विविध प्रश्नांना पाराशीनी यांनी समर्पक उत्तरे दिली.या विद्यार्थी
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. सुनीता सगट यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रम राबवले जात असून माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे विशद केले. तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांमधील अजय डीघोळे या नवउद्योजकास रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी एनएनएस विभागातर्फे रक्तदान आयोजित करण्यात आले होते.प्रा. विनय जोकारे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमिषा खैरनार व तेजस्वी बनसोडे या विद्यार्थ्यांनी केले.