पंढरपूर प्रतिनिधी
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड इन्स्टिट्यूट कमलापुर, केगाव व कोर्टी (ता.पंढरपूर) मधिल सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी "सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लिग २०२४" अंतर्गत पुणे व लोणावळा येथील सिंहगड कॅम्पस मध्ये क्रिकेट, बुद्धिबळ आणि टेबल टेनिस या स्पर्धेत आयोजन २१ डिसेंबर २०२३ पासुन सुरू करण्यात आले होते. या स्पर्धेत पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिका कुमारी मानसी सोमनाथ नवले यांनी बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक व बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पुणे सिंहगड संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेत सिंहगड संस्थेत व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेत पंढरपूर सिंहगडच्या प्राध्यापिका मानसी सोमनाथ नवले यांनी सुवर्णपदक व कांस्यपदक प्राप्त करून यश संपादन केले आहे.
प्राध्यापिका मानसी नवले यांच्या यशाबद्दल काॅलेजचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, संस्थेत संचालक सोमनाथ नवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यादरम्यान महाविद्यालयातील डाॅ. चेतन पिसे, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. अनिल निकम, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोट, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. शिरीष कुलकर्णी आदींसह सह काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.