भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे सरपंच राजकुमार पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची आज निवड झाली.या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे सर्वसाधारण आहे.
गावाची पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे. ज्या दिवशी निवडणूक होते त्याच दिवशी संध्याकाळी सर्वजण एकत्र येऊन चहापाणी करतात आणि गावच्या विकास कामाकरिता एकमेकांच्या सहकार्याने विविध योजना राबवल्या जातात. गावाच्या राजकारणात कोणत्याही समाजाचा भेदभाव केला जात नाही हीच परंपरा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.पण गावाच्या इतिहासात सरपंच पदी निवड करण्यासाठी निवडणुक घ्यावी लागली.
याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाचा उमेदवार योग्य तो निवडला जाईल अशी अपेक्षा ग्रामस्थांच्याकडून केली जात होती.ती पूर्ण झाल्याचे दिसून आले.
भाळवणी सरपंच पदा करिता 4 अर्ज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सरपंच पदा करिता आज निवड होणार झाली.तर सरपंच पदा करिता 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बी ए शिंदे,तलाठी प्रशांत शिंदे,ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे यांनी दिली होती.
दुपारी 2 वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत होती.त्यानंतर सरपंच कोण होणार हे समजणार होते.
एकूण 4 अर्जा पैकी 2 उमेदवारांनी नितीन शिंदे व अर्जुन लिंगे यांनी आपले अर्ज मागे घेतले.त्यामुळे 2 उमेदवार राहिले.त्यामुळे गुप्त मतदान घेण्यात आले.
रणजित जाधव यांना 9 मते मिळाली तर सुरेखा शिंदे यांना 8 मते मिळाली.त्यामुळे रणजित जाधव यांची निवड करण्यात आली.हि निवड प्रक्रिया शांतेत पार पडली.यावेळी पोलीस अधिकारी जाधव व शेंडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
गावाच्या विकास कामात कोणतेही राजकारण न करता सर्वांना समावेश करून काम करणार.ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन गावाचा विकास व प्रगती करणार आहे.
नूतन सरपंच रणजित जाधव