चेअरमन कल्याणराव काळे यांनी शेतकरी सभासदांची जोपासली विश्वास अहर्ता...
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया....
भाळवणी प्रतिनिधी
सध्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु आहेत. हंगामातील ऊस पुरवठादार यांचे उसाचे वजनाची पडताळणी करिता वैद्यमापन विभागाच्या भरारी पथकामार्फत जिल्यातील सर्वच कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी करण्यात येत असते पण कैलास शिवाजी काकडे रा.तादुंळवाडी ता.माळशिरस येथील शेतकरी यांनी बाहेरुन वजन करुन आणलेला ऊसाचे वजन आणी सहकार शिरोमणी कारखान्यातील वजन काटेवरील केलेले उसाचे वजन बिनचूक असल्याचे सांगून चेअरमन कल्याणराव काळे यांनी विश्वास अर्हता जोपासली असल्याचे मत शेतकरी सभासद यांनी व्यक्त केले.
तांदुळवाडी, ता.माळशिरस येथील शेतकरी कैलास शिवाजी काकडे व शशीकांत तुकाराम कदम यांनी आपला ऊस इतर वजन काटयावर वजन करुन सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर गळीतास आणला होता त्यावेळी दोन्ही वजन तंतोतंत जुळले असून त्या किलो मात्र सुध्दा फरक जाणविला नाही. यावेळी शेतकरी यांनी कारखान्याचे चेअरमन व प्रशासन यांचे आभार मानून सभासदांची विश्वासअर्हता आपले कारखान्याने जोपासली असल्याची भावना शेतकरी सभासद यांनी व्यक्त केली.
यावेळी शेतकरी कैलास शिवाजी काकडे व शशीकांत तुकाराम कदम यांचा सत्कार कारखान्याचे मुख्य शेतकरी गुळुमकर , ऊस पुरवठा आधिकारी हरिभाऊ गिडडे, यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी केनयार्ड सुपर वायझर डी.डी.काळे, सभासद बंडु पवार यांचेसह ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, उपस्थित होते.