सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आपलं आरोग्याकडे लक्ष देऊन अध्यापन करावे:- सुरेश पवार
करकंब प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी वसाहत केंद्र करकंब या शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीम सुनंदा गुळमे मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला प्रमुख वक्ते सुरेश पवार मा.जि.प.सदस्य बाळासाहेब देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे,सारिका पुरवत, चंद्रकांत गुळमे, डॉ.मृदुला तळेकर, अनिल बंडगर,संगीता करमाळकर,केंद्रप्रमुख ल.पा.कांबळे,विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे सुनील कोरे,शेखर कोरके,सुभाष गुळमे,प्रवीण गुळमे,राणी लेंगरे,विजया उंडे,सत्कारमूर्ती सुनंदा गुळमे ,यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या सत्कारानंतर समस्त मान्यवर आणि शिक्षिका भगिनी यांच्या शुभहस्ते श्रीम.सुनंदा गुळमे मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांना गेली २८,वर्ष तनमनधनानी सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेत अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत.यापुढील काळात आता स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्न करत रहा.आपल्या आरोग्याकडे सर्वांनी लक्ष दिले तरच अध्यापन चांगले होणार आहे.असे सुरेश पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
तसेच सर्व मान्यवरांनी ही भविष्यकाळात आपले आरोग्य, संभाळून जीवन आनंदमय सुखमय जाण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या, यावेळी सुनंदा गुळमे मॅडम यांनी आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आई वडीलांनी डी एड ला प्रवेश दिला आणि स्वतःच्या पायावर उभे केले.आणि पुढील सर्व आयुष्य विद्यार्थी विद्यार्थिनी साठी घालवले यांचा मला आनंद वाटतो आहे.याकाळात सर्वांनी सहकार्य केले.सांगितले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट कापसे यांनी केले.
सुंदर सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर आभार संतोष कापसे यांनी मानले.यावेळी पंढरपूर तालुक्यातील अनेक शिक्षक शिक्षिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुळमे परिवारातील सदस्य जयंत गुळमे,दीपक गुळमे, अतुल गुळमे,जितेंद्र गुळमे,किरण गुळमे यांनी अधिक परिश्रम घेतले.