मगरवाडी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे आयोजन भव्य दिव्य करण्यात आले आहे.
२२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयोध्या या ठिकाणी श्री प्रभू रामाच्या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत त्याच धर्तीवर पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे सोमवार दि.२२/१/२०२४ रोजी श्री.दर्लिंग मंदिर येथील भव्य ग्राऊंड लक्ष्मण शक्ती मुक्ती चे आयोजन केले आहे .तरी मंगळवार दि.२३/१/२०२४ रोजी सकाळी ६ वाजता आरती व महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेले आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील राम भक्त वाचक आणि सुचक यानी वेळेवर लक्ष्मण शक्ती मुक्ती चा लाभ घ्यावावा ग्रंथ वाचनाला २२ तारखेला ५:३० च्या सुमारास सुरूवात होणार आहे.
मगरवाडी ग्रामस्थांकडून येणाऱ्या प्रत्येक वाचक, सुचक,रामभक्त यांची बसण्याची व चहा पाणी जेवण यांची सुध्दा सोय मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे महीलासाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे व पुरूष मंडळी यांच्यासाठी ही बैठक व्यवस्था वेगळी करण्यात येणार आहे या लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचा लाभ पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यातील राम भक्तांनी घ्यावे असे आवाहन मगरवाडी येथील राम भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे .