पंढरपूर प्रतिनिधी
"कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय महाराष्ट्रातील एक नामांकित महाविद्यालय आहे. सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना हा अभ्यासक्रमाचा भाग झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये 'सेवा' हा शब्द महत्त्वाचा आहे." असे प्रतिपादन उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे डॉ.अरुण जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे हे होते. डॉ.अरुण जाधव पुढे म्हणाले की, "गौतम बुद्धांनी आपणास बहुजन हिताय बहुजन सुखाय हा संदेश दिलेला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण जनजागृतीचे काम करायचे आहे. स्वच्छतेचा संदेश आपणास सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. कर्मवीरांचा वारसा आपणाला पुढे चालवायचा आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय." प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, "व्यक्तिमत्व घडत असताना काही निर्णय घेणे आवश्यक असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारातून राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना 1969 मध्ये सुरु झाली. आज चाळीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी आहेत युवकांचे व्यक्तिमत्व घडवायचा आहे आपल्या समाजाला सोबत घेऊन जायचं आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावाची सर्वेक्षण करावे त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा. लोकप्रबोधनाची चळवळ निर्माण करायचे आहे. महाराष्ट्राची देशामध्ये ओळख आहे. आपल्या देशाला आणि राज्याला परंपरा आहे. महाविद्यालय शिक्षणामधून जीवनाला वळण मिळत असते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नवीन काहीतरी करण्याची संधी मिळत असते. आपणास विज्ञानवादी व्हायचे आहे." आपण विज्ञान शिकत असलो तरी आपण विज्ञानवादी आहोत का ? याचा विचार आपण करावा. श्रमाचा संस्कार कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकवला. गाडगे बाबांच्या स्वच्छतेचा संदेश त्यांनी दिला. गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी नवीन ज्ञान आत्मसात करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक सणामधून संस्कार मिळतात. प्रबोधन जनजागरण दुसऱ्या सोबत वर्तन कसे करायचे याविषयी त्यांनी सखोल विवेचन केले. त्यांनी श्यामची आई मूल्याचे शिक्षण देणारी होती जे काम करायचं ते प्रामाणिकपणाने करायचं अशा प्रकारचे विचाराची गरज आज असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.
राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटनाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी केले. या उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयामधील कला विभागाचे उप-प्राचार्य डॉ. बी.एस नाईकनवरे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, तसेच विज्ञान विभागाचे उप-प्राचार्य आर.जे.कवडे, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. यू. चोपडे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी लोंढे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेतील योजनेतील सदस्य प्रा.धनंजय कदम, प्रा.सागर शिवशरण, डॉ.सचिन थिटे, डॉ. संजय चव्हाण यांनी हा उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सचिन थिटे यांनी मांडले.