स्वच्छता असे जिथे ,आरोग्य वसे तिथे
भंडीशेगाव प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी सलग्नित अकलूज मधील रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी श्रीराम जन्मभूमी मंदिर कार्यक्रमानिमित्ताने श्रीराम मंदिरापासून प्रदक्षिणा मार्ग स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश दिला. या मोहिमे अंतर्गत भंडीशेगावमधील स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले.
स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी ,ग्रामपंचायत अधिकारी ,कर्मचारी ,नागरिक सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन ऋतुजा महारनवर , प्रेरणा माने देशमुख, प्रियंका नवले, कोमल मोहिते, अतिया काझी, प्रतिक्षा देशमुख, श्वेता जाधव, गीता जाधव, श्रद्धा पोळ, ज्ञानेश्वरी शिंदे या कृषी कन्यांनी केले. या कार्यक्रमास रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर .जी .नलावडे, प्रा .एस.एम.एकतपुरे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी प्रा .एम.एम.चंदनकर, प्रा .एच.एस.खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी भंडीशेगाव येथील अशोक यलमार ,विजय पाटील, संजय रणखांबे, गणेश पाटील, अनिल कंधारे, सुहास गिड्डे, नवनाथ माने, आदी मान्यवर उपस्थित होते.