पंढरपूर प्रतिनिधी
मोबाईल हा माणसाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला असताना हे सर्वांच्या आयुष्याचे केंद्र बनले आहे असे प्रतिपादन करुन या युगात सर्वात जास्त वापरले जाणारे हे मॉडेल असून विद्यार्थ्यांनी या मोबाईलचा अयोग्य वापर न करता त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला देत युट्युब वरील फक्त ज्ञानार्जनासाठी उपयोग करण्याचा संदेश यावेळी रुक्मिणी बँक, रुक्मिणी विद्यापीठ संस्थापिका सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांचेमार्फत मौजे. सिद्धेवाडी तालुका पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गतच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगीच्या कार्यक्रमात दिला.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भाईगुडे सर ,ए बी न्यूजचे गणेश गायकवाड यांचे सह पूजा गायकवाड ,उपप्राचार्य नाईकनवरे सर प्रा.डी.एम.चौधरी सर, सुयोग कदम सर ,सारंग जाधव उपस्थित होते.