मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडत असताना प्रामुख्याने मोहोळ तालुक्यातील मतदार संघामध्ये एकच विषय चर्चेचा ठरत आहे ते म्हणजे अगदी गावखेड्यापर्यंत हा नेता त्या ठिकाणी पोहचून अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेले किंवा कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रात व अन्य कोणत्याही परिस्थितीत अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती मिळताच त्याच क्षणी प्रामुख्याने लक्ष देत त्या कुटुंबातील व्यक्तीला लागेल ती मदत करत अडचणीत असलेल्या कुटुंब किंवा सदस्यांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मोहोळ तालुक्याचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते राजू खरे यांच्या माध्यमातून वारंवार दिसून येत आहे.
याचाच एक पुन्हा प्रत्यय म्हणजे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदार संघातील नेपतगाव असलेल्या या गावांमध्ये एक गरीब कुटुंबातील एक तरुण युवक आपल्या डोक्यावर असलेल्या कर्जापायी व होणाऱ्या त्रासामुळे आपल्या शेतात जाऊन फाशी घेत आत्महत्या केली सदर ही बाब उद्योजक राजू खरे यांना समस्या तात्काळ त्यांनी कुटुंबाची भेट घेत सांत्वन करत व आत्महत्या केलेल्या युवकाची समोर दोन लहान मुलं दिसताच त्यांच्या भवितव्यासाठी खरे यांनी तत्काळ रोख 50 हजार रुपयांची मदत केली,तालुक्यात मागेल त्याला रस्ता मागील त्याला पाणी देत मतदार संघातील जनतेसाठी जणू काही संकटमोचकच बनले असल्याचे नागरिकांमधून चर्चा होताना दिसून येत आहे.