पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे मकर संक्रांति निमित्त तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पारंपारिक सण उत्सव याविषयी आवड निर्माण व्हावी त्यांना त्याचे महत्त्व समजावे सामाजिक एकता, बंधुभावता या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा मकर संक्रांती हा सण दरवर्षी विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना आपल्या हातून तिळगुळ भरून हा सण साजरा करतात. विद्यार्थी व शिक्षक हे नातं कायमस्वरूपी गोड व्हावे या उद्देशाने सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक आपल्या हाताने तिळगुळ भरवत असतात .सर्व विद्यार्थीही शिक्षकांना तिळगुळ देऊन नमस्कार करतात. लहान चिमुकले यांनीही तिळगुळ वाटपाचा आनंद घेतला.
यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी मार्गदर्शन केले व सर्व सहकारी शिक्षकांना तिळगुळ भरवले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक दीपक देशमुख, सोमनाथ भुईटे, नागेश कांबळे,नियाज मुलाणी ,राजेंद्र भोसले, संतोष पवार ,वर्षा मोरे, शितल बागल, लीना बागल ,शीतल मस्के ,मसरुद्दीन पटेल, सीमा रकटे यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती मोठा उत्साह दिसून येत होता.