भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मकर संक्राती निमित् आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मळाव्याप्रसंगी चेअरमन कल्याणराव काळे यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकरी, वाहन मालक पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार व हितचिंतक यांचेशी सुसंवाद साधत तिळगुळ देवुन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कारखान्याकडे ऊस तोडणी करणारे कष्टकरी मजुर महिलांची मकर संक्रांत केवळ तिळगुळ वाटुन गोड न करता तिळ गुळाबरोबर साडी वाटप कारखान्याच्या संचालिका मालनबाई काळे, सौ.संगिता देठे, सौ.उषाताई माने यांचे शुभहस्ते करण्यात आले यावेळी अनमोल भेटीमुळे ऊस तोडणी महिला मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
सध्या सर्वांचे जीवन गतीमान झालेले असून, या धकाधकीच्या जीवनामध्ये आनंद आणि थोडेसे मनोरंजनाची गरज आहे असे मत चेअरमन कल्याणराव काळे यांनी कारखाना साईटरवर आयोजित केलेल्या तिळगुळ वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. मकर संक्राती निमित्त् कारखाना साईटवर आयोजित केलेल्या कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातील पंढरपूर शहर व पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, वाहन मालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचेशी थेट संवाद साधत चेअरमन कल्याणराव काळे यांनी सर्वांना तिळगुळ देत थोरा मोठयांचा आर्शिर्वाद व शुभेच्छा स्विकारल्या.
यानिमित्त आलेले पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी स्वरांजली प्रस्तुत सदाबहार जुन्या-नव्या हिंदी-मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या निमित्त सर्वांसाठी स्नेह भोजनाची ही व्यवस्थाही करण्यात आलेली होती. या प्रसंगी सुप्रभात मित्र मंडळाचेवतीने चेअरमन कल्याणराव काळे यांचा सत्कार अध्यक्ष बापुसाहेब देशमुख व सर्व सदस्य यांचे शुभहस्ते करण्यात आला या प्रसंगी युवा नेते, समाधान (दादा) काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी श्री.विठठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ दादा भालके, माजी संचालक युवराज पाटील, श्री विठठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, सिताराम महाराज साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणेश ठिगळे,यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार,व्हा.चेअरमन सादीक मुलाणी, सहकार शिरोमणीचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर व संचालक गोरख जाधव, मोहन नागटिळक, आण्णा शिंदे, युवराज दगडे, राजाराम पाटील, संतोष भोसले, जयसिंह देशमुख, अरुण नलवडे, परमेश्वर लामकाने, दिनकर कदम, सुनिल पाटील, अमोल माने, योगेश ताड, राजेंद्र शिंदे, मंडळ निशिगंधा सह.बँकेचे चेअरमन राजेंद्र जाधव,संचालक भानुदास सावंत, देवानंद गुंड-पाटील, संग्राम गायकवाड, पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक प्रशांत शिंदे, सतिश शिंदे, संदीप पाटील, राहूल पाटील, समीर कोळी, अमर सुर्यवंशी, शिवाजी धोत्रे,बाळासाहेब आसबे, ॲङसंदीप रणवरे, महादेव सुर्यवंशी, उत्त्म नाईकनवरे, राजाभाऊ माने, सुरेश देठे, पांडूरंग नाईकनवरे, सुभाष हुंगे-पाटील, बाळासाहेब यलमार, चंद्रकांत बागल, नंदकुमार उपासे,मोहन घोलप, भारत गाजरे, अर्जुन जाधव, व्यवस्थापक कैलास शिर्के यांचेसह प्रतिभादेवी व यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे सर्व संचालक, सुप्रभात मित्र मंडळाचे सर्व सदस्य्, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतुकदार, मोठया संख्येनी उपस्थित होते.
आलेले अतिथींचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले.