शास्त्र आणि शस्त्र जाणून घेऊनच त्याचा जीवनात उपयोग करावा:-संदीप मांडके, संकेत भोळे
करकंब प्रतिनिधी
करकंब श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवाचे व महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या सर्व कार्यक्रमांना करकंबकर भाविकांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिनांक १७ जानेवारी पासून ७ दिवस राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांच्या सुश्राव्य नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच संकेत बुवा भोळे यांचीही उपस्थिती लाभली त्यामुळे विशेष कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पूर्वरंगामध्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अभंगावर निरुपण करत शास्त्र आणि शस्त्र या विषयावर जुगलबंदी करीत असताना जीवन जगताना जशी शास्त्राची माहिती असने आवश्यक आहे तशी वेळप्रसंगी शस्त्र ही वापरता आले पाहिजे.तरच जीवनात यश प्राप्त होईल.आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक शस्त्र घेऊन उभे असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत तर अनेक ठिकाणी प्रगत शास्त्र आहे म्हणून आपल्या देशाची प्रगती होत असताना दिसत आहे . प्रत्येक गोष्टीचे शास्त्र माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर फजीती होते.आणि काही ठिकाणी शस्त्र वापरावेच लागते नाहीतर आपण राहूच शकत नाही.त्यामुळे आयुष्यात शास्त्र आणि शस्त्र ला अनन्य साधारण महत्व असल्याचे अनेक उदाहरणे देत सर्वं रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच 500 वर्षांनंतर रामरायाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली ही एक समस्त हिंदू समाजासाठी एक सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण आपण सर्वांनी अनुभवला,पुढे आख्यानामध्ये राजा विश्वामित्र यांनी शास्त्राचा आधार घेऊन आपले जीवन कसे यशस्वी केले.,आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी शस्त्रांचा वापर करून अफजलखान खानाचा वध कसा केला यावर अतिशय सुंदर आख्यान सांगून करकंब करांना मंत्रमुग्ध केले.अभ्यासपूर्ण निरुपण, तितकंच सुंदर गायन,संस्कृत भाषेचा अभ्यास, अप्रतिम पोवाडे गात रसिकांना खिळवून ठेवले.त्या़ंना तितकीच दमदार साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम राम अनवते पखवाज शिवराज पंडीत टाळ माऊली पिसे यांनी केली.शिवाय दररोज महिलांच्या विविध स्पर्धांमध्ये ही उत्सुर्तपणे प्रतिसाद देत सर्वं महिलांनी आनंद घेतला, कोष्टी समाज युवकांनी बनाळी येथून ज्योत आणून सर्वांनी स्वागत करत पूजन केले.
गुरुवारी शाकंभरी पौर्णिमा निमित्ताने चौंडेश्वरी मातेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत सर्व ट्रस्टी सर्वं कोष्टी समाज बांधव महिला पुरुष,युवक अधिक परिश्रम घेत आहेत.