ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
विद्वानाचां अनादर आणि मुर्खाचा सन्मान यामुळे वैचारीक क्षमतेचा धनी असणार्या मनुष्य प्रजातीचे वेगाने अध:पतन होत असुन, पुन्हा एकदा मनुष्य चार पायाच्या जनावराप्रमाणे आचरण करु पहात आहे अशा शब्दात मनुष्य वर्तनाची मिंमासा करत विद्वान सर्वत्र पुज्यतेचे पालन करा.त्यांचा जीवंतपणी सन्मान करा असे धीरगंभीर आवाहन सुप्रसिद्ध लेखक तथा इतिहास अभ्यासक नवनाथ पाटिल गायकर यांनी केले.
सुर्योदय सर्व समावेशक मंडळ जळगाव संचलीत नाशिक जिल्हयात आयोजीत २ रे साहित्य संमेलन प्रसंगी परिसंवादात गायकर पाटिल हे प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.
"थोरा-मोठयाच्यां जपु या स्मृती" या विषयावर आयोजीत परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त न्यायधीश वसंत पाटिल हे होते.
आपल्या परिसंवादात स्वांतन्त्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज व स्व.प्रा.शंकर बोर्हाडे यांच्या चरित्र व स्मृतीनां उजाळा देतानां ते पुढे म्हणाले कि पुस्तके म्हंणजे विचाराची खाण आहे. यामुळेच समृद्धी व शांततेचे रान हिरवेगार छान आहे. मात्र आधुनीकतेचा दंश मनुष्य प्रजातीला असा लागला आहे कि सृजनशीलतेचा वंश टिकतो कि नाही अशी भीती वाटायला लागली आहे.माणसाची सदसद्विवेकी बुद्धीला गंज चढुन माणसे भंग पावायला लागली आहेत.साहित्य संमेलने याच दु:खावरची औषधे आहेत.इथे मंथन,चिंतन आहे.आणि काळाची ही गरज आहे.
परिसंवादाचे प्रास्तावीक करतानां सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव चे संस्थापक तथा साहित्य संमेलनाचे निमंत्रक सतीश जैन यांनी अ.भा.मराठी साहित्य संमेलनावर करोडो रुपयाचा खर्च होत असुन तीच तीच माणसे यात सातत्याने मिरवत असल्याची बोचरी टिका करत संमेलनाचे स्वरुप बदलण्याची मागणी केली.
माजी न्यायधीश वसंत पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरुन बोलतानां मंडळाचे कौतुक केले.
आभार सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक चे जिल्हा अध्यक्ष सावळीराम तिदमे यांनी मानले.
या प्रसंगी संमेलनाध्यक्ष तथा गझल नवाज भीमराव पांचाळे, जेष्ठ साहित्यिक प्रा.अशोक काळे, प्रा.यशवंतराव पाटिल सर, श्रीमती अलका ताई कुलकर्णी, लेखक संजय गोराडे, नंदकुमार दुसानीस, श्री.काळे,अशोक भालेराव, किरण सोनार, श्रीमती शोभा बडवे, संदिप पाटिल आदिसह अनेक साहित्यीक व रसिक उपस्थित होते.