सौ. सुनिता कृष्णा चांडोले यांचे निधन
इसबावी येथील रहिवासी सौ. सुनिता कृष्णा चांडोले (वय ५१) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १४ रोजी रात्री ९.१५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. श्रीसंत नामदेव शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भावलेकर गुरुजी यांच्या त्या कन्या होत्या.
गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते.