सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार २के२३- कॉलेज लेव्हल प्रकल्प महोत्सव उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घघाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.नागेश पाथरूठ आणि श्री.शशी चौगुले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे,डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ.विजय बिरादार, डॉ. प्रदिप तपकिरे, डॉ.विनोद खरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील शाखापूरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आविष्कार २के२३ या कॉलेज लेव्हल इव्हेंट मध्ये विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट आयडिया पोस्टर व मॉडेल या माध्यमातून सादर केले.या स्पर्धेमधून एकूण ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अशा प्रकल्प महोत्सवातून विद्यार्थ्यांची कल्पकशक्ती व व्यक्तीमत्व विकास विकसित होत असतो. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.सुनील शाखापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सेक्रेटरी सागर करमल, कोमल आवताडे व विश्वजित माळी यांनी परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून
श्री.नागेश पाथरूठ आणि श्री.शशी चौगुले यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रंचालन अनिकेत कांबळे यांनी केले.