सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरातील प्रतिष्ठित कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते श्री सोमशेखर ईरप्पा भोगडे यांच्या ६१व्या प्रशांत पदा पण निमित्त वर्षभर ६१आरोग्य शिबिर, ६१ क्रीडा , ६१ शैक्षणिक कार्यक्रम 61, धार्मिक कार्यक्रम करण्याचा मानस गुरुविदया प्रतिष्ठान, लायन्स क्लबच्या माध्यमाने कार्यक्रम वर्षभर घेण्यात येणार आहे. श्री सोमशेखर भोगडे यांनी गुरूविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक असून लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटी चे सदस्य, माजी अध्यक्ष,कॅबिनेट, सचिव, असे विविध पदावर कार्यरत आहेत त्याचबरोबर त्यांनी सोलापुरातील दमाणी ब्लड बँकेचे अजीव सभासद आहेत. धार्मिक कार्यात सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात, त्यांनी नेहमी अग्रेसर असतात प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षक दिन, क्रीडा दिन, पत्रकार दिन, आरोग्य शिबिर, बसव जयंती, असे विविध कार्यक्रम करतात.
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय विविध खेळा मैदानात चमकले. त्यांनी आजतागायत ३२ वर्ष सेवा सिध्देश्वर सानिध्यात आपली सेवा रुजू केली.
तसेच तेज न्यूज परिवार कडून हि सोमशेखर भोगडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना