पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर पंढरपूर तिहे् मार्गे रोड वरील एसटी वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आज दिनांक 11 /12 /2023 रोजी सोलापूर आगार व्यवस्थापक यांना ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निवेदन देऊन आठ दिवसांमध्ये सुरळीत वाहतूक न चालू झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
ग्राहक समिती संस्थापक अध्यक्ष श्री तानाजी गुंड साहेब व यावेळी ग्राहक समिती महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका परांडे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले .यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ सर,सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष मंगलताई नाईकनवरे, युवतीआघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा भोसले,मोहोळ तालुकाध्यक्ष बबनबन नरोटे,मोहोळ तालुका उपाध्यक्ष किसन गायकवाड उपस्थित होते.