सोलापूरची उदयोन्मुख गायिका आणि अभिजात शास्त्रीय संगीताचा आश्वासक चेहरा देवश्री दंडवते
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर श्री दंडवते दत्त मंदिर येथे पं.द.वि.काणेबुवा संगीत गुरुकुल सांगली आणि विदुषी मंजुषाताई पाटील-कुलकर्णी यांच्या शिष्या देवश्री दंडवते तनिष्क अरोरा यांनी पहिल्या दिवशी अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी देत राग यमन आणि बिहाग अतिशय तयारीने सुंदर गात रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दुसऱ्या दिवशी रसिका वैशंपायन, रसिका पैठणकर, देवश्री दंडवते शची ब्रह्मे,अनुष्का साने,आर्या देव,यांनी सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करत वातावरण भक्तिमय करत पाहावा नयनी ,विष्णूमय जग तुझे ध्यान,सोडूनी राऊळाला, परब्रह्म निष्काम, कृष्ण देखिला,श्रीरंगा कमलाकांता,आदी अप्रतिम संतरचना गाऊन शेवटी अगा वैकुंठीच्या राया ने भैरवी गाऊन अतिशय सुंदर अभंगवर्षा कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत निवेदन स्नेहा शिंनखेडे,सुनिल शिंनखेडे,तबला दिपीन दास पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम माधव लिमये टाळ तनिष्क अरोरा यांनी केली.
दररोज काकडा प्रवचन संगीत भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गोविंदराज महाराज दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिष्यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या दत्तजयंती सोहळ्याचा सर्व सोलापूरकर भक्तांनी लाभ घ्यावा.असे आवाहन मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.