ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
इगतपुरी तालुक्यातील आडवन व पारदेवी या गावांतील शेतकरी प्रस्तावित औद्योगिक वसाहतिसाठी जवळपास सातशे एकर जमीन संपादित करण्याचा शासनाचा माणस आहे म्हणून सर्व शेतकरी शासनाच्या विरोधात एकवटले असुन आता पुनः तालुकयात नवीन प्रकल्प नको असा सुर उमटु लागला आहे त्यासाठी दोन्ही गावांतील शेतकर्यांनी कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ व उपसरपंच पांडुरंग कोकणे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत घोटी येथे बैठक घेवुन या प्रक्लपास तीव्र विरोध दर्शवला आहे.
आधीच तालुक्यातील जवळपास सत्तर टक्के जमीन शासनाने विविध प्रकल्पासाठी संपादित केली असुन याठिकाणी शेतियोग्य व बागायती जमीन जात असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे शेवटच्या श्वासापर्यत जमीन देण्यास आमचा विरोध असुन प्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्धार यावेली करण्यात आला.
या बैठकीस दत्तात्रय गुंजाळ रमेश कोकणे, तुकाराम कोकणे, नामदेव कोकणे, रामदास रेरे, बाळु गायकर, पंढरी शेलार, सुरेश करवर, विष्णु कोकणे, दत्तु कोकणे, साहेबराव पुडे, निवृत्ती पुंडे, जगन भगत, भगवान शेलार, खंडु कोकणे, खांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.