मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन (नियोजित) आणि आय लव्ह मुंबई (I Love Mumbai) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने आयोजित "ज्यु.मुंबई श्री २०२३" या मानाच्या स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी जोगेश्वरी (पूर्व) येथील अस्मिता भवन येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुबंई जिल्हापुरती मर्यादित असून एकूण सहा गटात खेळवली जाईल. तरुणाईला भुरळ घालणाऱ्या "ज्यु. मेन्स स्पोर्ट्स फिजिक" आणि "मास्टर्स मुंबई श्री" यांचा देखील समावेश स्पर्धेत करण्यात आला आहे. स्पर्धेचे खास आकर्षण "दिव्यांग मुंबई" श्रीचे आयोजन करून आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
"मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन" (नियोजित ) या अधिकृत संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल कनाल , संस्थेचे सचिव अमोल कांबळी , खजिनदार जोसेफराज ऍंथोनी तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी येणार्या काळात अश्या स्पर्धेचे आयोजन करून तरुणाईला योग्य मार्गदर्शन करण्याचे ठरविलेले आहे.