म्हसवड प्रतिनिधी विजय टाकणे
यात्रेतील सिनेमाला जीवदान देणारे विजय काका कुलकर्णी यांचं अखेर म्हसवड यात्रेनंतर दुःखद निधन झाले आहे सिनेमा प्रेमी संघर्ष वीर म्हणून विजय काका कुलकर्णी यांची ओळख आहे. वयाच्या ७६ वर्षी त्यांचे निधन झाले.
पळशी तालुका माण येथील मूळ रहिवासी असणारे विजय काका कुलकर्णी यांनी संपूर्ण आयुष्य सिनेमाच्या टुरिंग टाकीच्या उत्कर्षासाठी घालवलं त्यांचं प्राथमिक शिक्षण पळशी येथे झाले, माध्यमिक शिक्षण गोंदवले येथे झाले. विश्वजीत कुलकर्णी हे त्यांचे चिरंजीव आहेत.
या संघर्षामध्ये त्यांनी अनेक चढउतार पाहिले पण कधीही हार मानली नाही.
सिनेमाचा तंबू घेऊन महाराष्ट्रभर सर्व यात्रेमध्ये फिरते टुरिंग टाकीज चालवणारे विजय काका अखेर काळाच्या पडद्याआड झालेले आहेत.
यामुळे टुरिंग टाकीचा एक सच्चा सेवक काळाच्या पडद्याआड झाला.
गेली साठ वर्ष सातत्याने फिरत्या तंबूला जीवदान देण्यासाठी विजय काका कुलकर्णी आणि जीवाचं रान केलं होतं.
अनेक वेळा टुरिंग टॉकीज व्यवसायाला ऊर्जीत अवस्था आणण्यासाठी विजय काका कुलकर्णी यांनी शासनाचे उंबरठे झिजवले .
मात्र सिनेमाच्या तंबुला शासनाने अनुदान न दिल्यामुळे अखेर स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशाने वेळप्रसंगी तोट्या मध्ये यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंची करमणूक करण्यासाठी फिरत्या टू रिंग टाकीचा व्यवसाय गेली सहा दशके त्यांनी चालवला.
वेळप्रसंगी त्यांना अनेक वेळा तोटाही सहन करावा लागला , यात्रेत
गावकऱ्यांनी त्रास दिला,मात्र कधीही त्यांनी हार मानली नाही.
अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी या टूरिंग टाकीच्या व्यवसायामध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं होतं.
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ रथयात्रेमध्ये दरवर्षी हमखास यात्रे करूची करमणूक करणारा
विजय काका कुलकर्णी यांचा श्रीराम टुरिंग टॉकीज हा फिरता सिनेमा म्हणजे म्हसवडकराचे यांचे खास आकर्षण होतं.
प्रत्येक यात्रेमध्ये श्रीराम टुरिंग टॉकीज लोकांची करमणूक करण्यासाठी आणि यात्रेकरूंना नवीन नवीन सिनेमे दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे .
सुरुवातीच्या काळामध्ये मोठा संघर्ष करून विजय कुलकर्णी यांनी आपला हा व्यवसाय जोमात चालवलेला होता.
मधल्या काळात या व्यवसायाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले तर गावोगावी आलिशान एअर कंडिशन थिएटर निर्माण झाल्यामुळे प्रेक्षकांनी तंबूकडे पाठ फिरवली होती.
मात्र या काळात सुद्धा प्रत्येक गावोगावी जाऊन टुरिंग टाकी जिवंत ठेवण्यासाठी जिद्द सोडली नाही.उलट
विजय काका कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील यात्रेमध्ये जाऊन प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले मात्र .
या प्रयोगामध्ये त्यांना फारसं यश आलं नाही. पण अखेरपर्यंत जिद्द सोडली नाही.
फिरता तंबू हा एयर कंडीशन करण्याचा त्यांचा मानस होता , तंबू , टुरिंग टॉकीज यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अतिशय महत्त्वाचे आहेत .
टुरिंग टाकीजला थिएटर चा लुक देणारा पहिला टुरिंग टाकीचा मालक म्हणून विजय कुलकर्णी यांची ओळख निर्माण झालेली आहे.
मात्र म्हसवड येथील श्री सिद्धनाथ यात्रेच्या नंतर दोनच दिवसांनी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली सिनेमाच्या तंबूसाठी आयुष्य भर झटणारा सिनेमाचा शौकीन राजा मात्र हरवला आहे . त्यांचा मन मोकळा, निष्पाप स्वभाव यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मित्र जोडले आहेत, कामगारांना मुलांपेक्षा जास्त प्रेम करणारा सिनेमा मालक म्हणून विजय कुलकर्णी यांची ओळख आहे.
आज त्यांच्या नावाने श्रीराम टॉकीज सुरू आहे मात्र विजय कुलकर्णी यांचं परिश्रम या भविष्यकाळातील तरुणांसाठी प्रेरणादायी असे ठरणार आहेत.
त्यांना कला क्षेत्रातील कलादर्पन २०२३ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
गेली 60 वर्ष सातत्याने सिनेमा जगणारा एक सच्चा सिनेमा प्रेमी मात्र काळाच्या पडद्याआड झाला त्यांच्या जाण्याने सिनेमाच्या टुरिंग टाकीज व्यवसायामध्ये मोठी हानी झाली आहे त्यांच्या यात्रेला म्हसवड करांच्या वतीने विनम्र अभिवादन.
त्यांचे मागे एक मुलगा, पत्नी ,भाऊ असा परिवार आहे.