पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे
श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांचे संयुक्त विद्यमाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नामदेव जयंतीच्या पूर्व संध्येला नुकतेच डाॅ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तूत सादरकर्ते डाॅ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचा 'बहुरूपी भारुड' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वासुदेवाची वाणी, कडकलक्ष्मीची गाणी आणि संत महतांची भजने अशा सूर आणि तालाने नटलेल्या डाॅ. भावार्थ देखणे यांच्या "बहुरूपी भारुड" या कार्यक्रमात महाराष्ट्राची संत परंपरा आणि लोककलेची परंपरा उलगडली.
श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सर, माॅडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र झुंजारराव सर, नामदेव समाजोन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे व पंढरपूर येथील केशवराज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, रामचंद्र मेटे, श्रीमती वैशाली तुपसाखरे, सौ. वासंती रहाणे, मकरंद टिल्लू यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन, नामदेव महाराज यांचे मुर्ती पुजनाने व ना.स.प. चे अध्यक्ष कै. संजीव तुपसाखरे यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
डॉ. भावार्थ देखणे यांचेसह अवधूत गांधी, अभय नलगेसह ३५ हून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या संत नामदेव महाराज पालखी सोहळा, ज्ञानोबा माऊली च्या गजरात रंगमंचावर सादर झालेले वारकरी, कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल, संत नामामध्ये दंग होऊन फेर धरणारे वारकरी अशा भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अवधूत गांधी यांनी संत नामदेव महाराज यांच्या वेशात रंगमंचावर प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डाॅ. भावार्थ देखणे हे वासुदेवाच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांसमोर आले. त्यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून वासुदेवाची गाणी आणि लुप्त होत चाललेली वासुदेव परंपरा यांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर कडकलक्ष्मीच्या वेशात, पारंपारिक गोंधळ सादर करून प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवले.
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, भा.ज.पा. शहर अध्यक्ष धीरज घाटे, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, डाॅ. मिलिंद भोई, ना.स.प.चे विश्वस्त वसंतराव खुर्द, बापूसाहेब बोत्रे, सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल पोरे, डाॅ. ओम श्रीश दत्तोपासक, प्रदिप पोरे, शिरीष मोहीते, लोकमान्य मल्टीपल मुख्य समन्वयक भालचंद्र कुंठे, मा. नगरसेवक नामदेव माळवदे, मा. नगरसेवक बाबा कुंभार यांचेसह पुणे शहर व परिसरातील ज्ञातीसंस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातील मोठा बहुजन जनसमुदाय उपस्थित होता
यावेळी संदीप लचके यांनी, सध्याची तरूण पिढी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या विळख्यात गुरफटलेली असून संतसाहित्य व लोककला लोप पावत चालली आहे. यासाठी बहुरूपी भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड शहर शाखेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते म्हणाले की संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्र (पंढरपूर) पासून ते पंजाब(घुमान) पर्यंत भागवत धर्माची पताका पोहोचवली. नामदेव महाराज यांच्या कार्याचे स्मरण म्हणून बहुजनासाठी "बहूरूपी भारूड" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव सुभाष मुळे, कार्याध्यक्ष रणजीत माळवदे, उपाध्यक्ष कुंदन गोरटे, अक्षय मांढरे, सुभाष पांढरकामे, सोमनाथ मेटे, खजिनदार विजय कालेकर, शिवाजी माळवदकर, राहुल सुपेकर, स्वप्निल खुर्द, ज्ञानेश्वर पाटेकर, तर पिंपरी चिंचवड शहर शाखेचे उपाध्यक्ष कैलास नेवासकर, सचिव रेखा गाडेकर यांचे सह पुणे शहर शाखेच्या महिला कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.
प्रशांत सातपुते यांनी कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन करून कार्यक्रमाने उंची गाठली. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.