पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वृक्षारोपण चे अजून करण्यात आले.
उज्वल भारत देशाच्या निर्मितीसाठी आजच्या पिढीला साक्षर आणि शिक्षण समृद्ध करणे ही काळाची गरज आहे. सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असणाऱ्या शैक्षणिक विश्वातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेचा हा प्रवाह गतिमान होऊन त्यांना विधायक पद्धतीने प्रोत्साहित करण्यासाठी आमदार प्रेमी ग्रामस्थांनी या दिमाखदार सोहळ्याच्या आमदार समाधान दादा आवताडे यांचे निष्ठावंत समर्थक प्रथमेश दिलीप बागल यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित पद्माकर बागल, दिलीप बागल ,मोहन बागल,महादेव फाटे, सुधाकर फाटे,अविनाश मोरे, शांतीनाथ बागल , अरविंद बागल , राजेद्र हुंडेकरी,प्रसाद कळसे,किशोर जाधव,शरद चव्हाण,अभिजित मोरे,दादा घायाळ,अतुल बागल,विकास आवताडे,पोपट बागल,नागनाथ बागल,सुनील ननवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.