सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त 'शांताई ' अनाथआश्रम व वृद्धाश्रम सोलापूर येथे भेट दिली. या विद्यार्थ्यांनी अनाथआश्रमातील चिमुकल्या मुलांना आणि वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना दिवाळीनिमित्त फराळ, फटाके, आकाशदिवा, सजावटीचे साहित्य, कपडे, शालेयपयोगी साहित्य इत्यादी वस्तू भेट दिल्या आणि लहान मुले व वृद्धां सोबत दिवाळी साजरी केली.
विद्यार्थ्यांनी मुलांसोबत क्रिकेट मॅच आणि विवीध खेळ खेळले. याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील इटॉस कमिटी ( इले्ट्रॉनिक्स अँड टेलीकमुनिकेशन ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स २के२३) चे सदस्य उपस्थित होते व तसेच तृतीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कमिटी प्रेसिडेंट सारंग पाटील यांच्या समवेत सर्व सदस्यांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य करून ही आनंददायी भेट पार पाडली.या कार्यक्रमासाठी सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, डॉ.एस.एस.शिरगण यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.